Sunday, May 31, 2020

लॉक डाऊन

लॉक डाऊन सुरु झाले, आणि काम बंद झाली,कमाई थांबली पण खर्च मात्र चालू आहे सुरवातीला काही नाही वाटलं, पण आता 5 व लोक डाऊन आहे दिवस जाता जात नाही  माझे काम शिवण काम आहे कपडे शिवले तरी न्यायला कधी येतील  नक्की नाहीं  मलाच कळत नाही ,
आयुष्य जगण्यासाठी काम करावं लागतं पण आज जीव वाचवण्यासाठी घरात बसणे हा पर्याय किती दवस हेअसं चालणार.
स्वाभिमानाने जगायचं असेल तर मृत्यूशी दोन हात करावे लागतील पण वाटत आपल्या मुळे इतरांना पण त्रास होईल मग काय कोड सुटत नाही.

Monday, April 27, 2020

आयुष्य

काही गोष्टी अशा असतात ज्या आपण इच्छा असून पूर्ण करू शकत नाही  नीयती पुढे  आपलं काहीच चालत नाही,,,,

अक्षयत्रीतीया

अडचण,अक्षय त्रितीयेला  मयत वडिलांना मुलाने जेवायला घालायचं असते म्हणतात .त्याप्रमाणे सासूबाईंनी सगळी तयारी केली . पूजेचा  मान मोठ्या मुलाचा पूजा कर म्हटले की नको तू कर म्हणायचे, वडिलांबरोबर आबांच्या पण फोटोची पूजा केली,आबा माझे सासरे ,काय तर म्हणे आबांनी इस्टेट नावावर केली  बिन आईचा म्हणून बापाचा मान त्यांना   ,ज्या बापानं सगळं आयुष्य ह्यानच्यासाठी घालवल त्याच काहीच नाही.का तर आयुष्याचं शेवटी अपंग झाले होते कमरे पासून काही कळत नव्हते,  असताना जेवण केलं का नाही हे सुद्धा विचारलं नाही कधी ,लहान मुलानं मात्र सगळी सेवा करायचा पण त्याला आई म्हणून त्याची जबाबदारी आईची.ह्या जगात पैसे ला किंमत आहे,,,,,

Sunday, April 12, 2020

जोडीदार

ज्या व्यक्तीला कधी घरात बसायचं माहित नसते. पण एक अपघात होऊन ती व्यक्ती निकामी होते.त्यांनी कस सहन केलं असेल असा प्रश्न सतत पडतो,आपण मात्र स्वार्थी होऊन त्यास जपत होते.आज वाटत कि  तो माझा स्वार्थ होता .
पण त्यांना पण जगण्याची इच्छा होती पन उपयोग काय
जन्म आणि मृत्यू  आपल्या हातात नसते .
खरं  होय ना....